Header Ads

गुरू पौर्णिमा विशेष


गुरू पौर्णिमा विशेष:

मित्रांनो......असं वाटतं आपल्याला एक अद्भुत शक्ती हवी होती. ती म्हणजे पुन्हा विद्यार्थी होऊन आपल्या गुरूंच्या हातून पुन्हा शिक्षण घ्यावं. आपल्या गुरूंच्या सहवासात पुन्हा एकदा काही काळ रहावं. गुरूंचे खडू-डस्टर पुन्हा टिचर रूममध्ये ठेवण्याचा गोड आनंद मिळावा. काही चांगले काम केलं की गुरूंची कौतुकाची थाप पाठीवर पडावी. जर गुरू आपल्या गल्लीतून वा गावातून फेरफटका मारतांना दिसले तर एक आदरयुक्त भितीने लपुन बसावं. तसेच वर्गात गुरूंनी प्रश्न विचारणे आणि त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोट वर करण्याची स्पर्धेत सहभाग घेण्याचा आनंद आणि त्यात आपल्या मित्रांना उत्तरे येत नसल्याचं दुःख....... सर्व वर्ग मित्रांशी मनसोक्त गप्पा माराव्यात. आपल्या शाळेच्या पटांगणात मनसोक्त खेळावं. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घ्यावा मग ते भाषण स्पर्धा असो, लेझीम पथक असो, शालेय व्होलीबाॅल स्पर्धा असो. अशा अनेक जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. मी स्वतः या सर्व अनुभुतिंचा आनंद घेतलाय. खरंच अविस्मरणीय! अतुलनीय! माझ्या शालेय जीवनातील प्रत्येक शिक्षकांचा मी खूप ऋणी आहे. 
सर....ते दिवस जेव्हा आठवतात ना. मन भरून येतं. प्रत्येक शिक्षकांची शिकवण्याची विशिष्ट पद्धत अजुनही तशीच डोळ्यासमोर आहे. तुम्ही जेव्हा आमच्या समोरून येता-जाता, तेव्हा औपचारिकता म्हणून आपण एकमेकांना स्मित हास्य करतो. परंतु मनातुन भरपुर काही बोलायचं असतं. असो, आज लिहून माझ्या मनातलं व्यक्त केलं.

माझ्या_गुरूंसाठी.....
गुरूपेक्षा श्रेष्ठ दुसरा देव नाही,
गुरूच्या कृपेपेक्षा मौल्यवान दुसरा लाभ नाही...
गुरूपेक्षा मोठे काेणते पद नाही...
जीवनात गुरूचे स्थान सर्वोच्च आहे. 
म्हणूनच हा संदेश... सर्व गुरूंना वंदन...!

आपलाच शिष्य, 
महेंद्र म्हैसरे लासुर 
Powered by Blogger.